मराठी कविता -- रोज पाऊस दिसावा
कोरडया मातीत पडती,
कोऱ्या पावसाचे थेंब,
उठती तनुंतून मातीचा धुंद सुगंध ।। १ ।।
हलके होऊन मन उडू लागे धुंद-धुंद,
वाऱ्याची झुळूक ती मोहरितसे अंग-अंग,
पावसाची एक सर करीतसे ओलेचिंब ।। २ ।।
आवडता हा पावसाळा,
वाटे रोजचं असावा,
उघडता कवाडे घराची,
रोज पाऊस दिसावा..!
रोज पाऊस दिसावा ।। ३ ।।
No comments:
Post a Comment