Saturday, April 15, 2023

मि. नटवरलाल

 


 मि. नटवरलाल 

            हा चित्रपट ८ जून १९७९ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माता टोनी ग्लाड असून दिग्दर्शक राकेश कुमार आहेत. या चित्रपटाची कथा ग्यानदेव अग्निहोत्री यांनी लिहिली असून पटकथा राकेश कुमार यांनी लिहिली आहे. कादर खान यांनी संवाद लिहिले आहेत. आनंद बक्षी यांनी गाणी लिहिली असून राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केली आहेत. 'मेरे पास आवो, मेरे दोस्तो' हे गाणे अमिताभ बच्चन यांनी गायले असून अन्य गाणी मोहमद रफी, किशोर कुमार, लता मंगेशकर, उषा मंगेशकर अनुराधा पौडवाल, आशा भोसले यांनी गायली. लता मंगेशकर व किशोर कुमार यांनी गायलेले व अमिताभ व रेखा यांच्यावर चित्रित झालेले 'परदेसीया, परदेसीया' हे गाणे सुपरहिट झाले. अमिताभ बच्चन, रेखा, अजित, अमजद खान यांच्या मुख्य भुमिका आहेत. 

               चित्रपटाचे नाव आणि मुख्य व्यक्तीरेखा कुख्यात भारतीय ठग नटवरलाल यांच्यापासून घेतले आहे. या चित्रपटाचे वैशिष्ठय म्हणजे अमिताभ बच्चन यांनी 'मेरे पास आवो, मेरे दोस्तो' या लहान मुलांच्या गाण्यासाठी पहिल्यांदाच आपला आवाज दिला. नंतर लावारीस, सिलसिला, पुकार या चित्रपटात त्यांनी गाण्यासाठी आपला आवाज दिला. या चित्रपटाचे शूटिंग काश्मीरमध्ये झाले असून बहुतांश शूटिंग बीरवाह, जम्मू-काश्मीर येथे झाले आहे. 

 'मेरे पास आवो, मेरे दोस्तो' या गाण्याचा किस्सा --

              अमिताभ बच्चन यांनी 'मेरे पास आवो, मेरे दोस्तो' या लहान मुलांच्या गाण्यासाठी पहिल्यांदाच आपला आवाज दिला. याआधी हे गीत संगीतकार राजेश रोशन किशोर कुमारकडून गाऊन घेणार होता परंतु हे गीत कहाणीच्या स्वरूपातील आहे व त्यात संवाद अधिक आहेत तेव्हा हे गीत खुद्द अमिताभनेच गावे अशी सूचना गीतकार आनंद बक्षी यांनी केली. सुरवातीला हे गीत गायला अमिताभ राजी नव्हता परंतु आनंद बक्षी यांनी विनंती केल्यावर अमिताभने हे गीत गायले. हे गीत लहान मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. 

अमिताभचे फेमस डायलॉग --

१) हर चोर अपनी मौत मरता नहीं, मारा जाता है ।

२) तु तो अपने साथीयोंको भी धोका दे सकता है... लेकिन मै अपने दुश्मन से किये हुए वादे को भी पूरा करता हूँ ।

कथानक --     

           नटवर हा युवक असून त्याच्यावर प्रेम करणारा त्याचा मोठा भाऊ गिरीधारीलाल आहे. तो पोलीस अधिकारी असतो. गिरीधारीलालला मोठा गुन्हेगार असलेला विक्रम लाच घेण्याच्या गुन्ह्यात फसवतो. 

            नटवर जेव्हा मोठा होतो तेव्हा श्री नटवरलाल म्हणून एक रहस्यमय अंडरवर्ल्ड व्यक्तिरेखा म्हणून स्वतःसाठी एक गुप्त ओळख निर्माण करतो. तो विक्रमाचा हळूहळू पण निश्चितपणे सूड घेण्याचा निर्धार करतो. गिरीधारीलालला त्याचा हेतू समजत नाही आणि त्याच्याबद्दल राग निर्माण होतो. 

            एक कुप्रसिद्ध  अंडरवर्ल्ड व्यक्ती आणि विक्रमचा माजी सहकारी याचेकडून नटवरला कळते कि विक्रम चंदनपूर नावाच्या गावात आहे. आणि मिकीचा एक सहकारी फकीरचंदच्या ताब्यात असलेला हिऱ्याचा हार विक्रमला पाहिजे. नटवर हार चोरतो. यातच असे कळून येते कि विक्रमने मिकीचापण विश्वासघात केलेला असतो त्यामुळे मिकीसुद्धा विक्रमचा बदला घ्यायला उत्सुक असतो. मिकी खुलासा करतो कि गावकऱ्यांना घाबरवण्यासाठी विक्रम एका वाघाचा उपयोग करत असतो. अवतारसिंगच्या वेशात नटवर चंदनपूरला पोहचतो. 

            नटवर विक्रमचा कसा बदला घेतो हे चित्रपटगृहातच जावून बघायला हवे.             

                             

                                   'परदेसीया, परदेसीया' हे गाणे सुपरहिट

 

 

 

 

 

 

Friday, April 14, 2023

राम बलराम

 


 राम बलराम 

            हा चित्रपट २८ नोव्हेंबर १९८० रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्माते आहेत टिटो तर दिग्दर्शक आहेत विजय आनंद. या चित्रपटाची कथा विजय आनंद यांनी लिहिली आहे. या चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली असून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केली आहेत. महमद रफी, किशोर कुमार, आशा भोसले, लता मंगेशकर यांनी गाणी गायली आहेत. 

              ह्या चित्रपटात धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, रेखा, झीनत अमान, अमजद खान, अजित, प्रेम चोप्रा यांच्या मुख्य भुमिका आहेत. अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी एकत्रितपणे काम केलेला हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी या दोघांनी शोले व चुपके चुपके चित्रपटात एकत्रित काम केले आहे. या चित्रपटात अमिताभने पोलीस इन्स्पेक्टरची भुमिका केली आहे तर धर्मेंद्र मोटार मेकॅनिक दाखवला आहे. 

            'एक रास्ता दो राही' हे गाणे अमिताभ व धर्मेंद्र यांच्यावर चित्रित केले आहे. याआधी अशाच प्रकारचे या दोघांवर चित्रित केलेले शोले चित्रपटातील 'ये दोस्ती हम नहीं तोडेंगे' हे गाणे आहे. शोलेमध्ये मोटर सायकलवर गाणे चित्रित केले आहे तर या चित्रपटात टमटम दाखवली आहे. 

कथानक --

            राम बलराम लहान असताना त्यांच्या कटकारस्थानी चाचा जगतपालने त्यांच्या आई वडिलांना मारले व दोघांना खोटेच सांगितले कि त्यांचे आई वडील एका दुर्घटनेत मारले गेले तसेच दोघांना सांभाळण्याचे वचनही देतो. 

             चाचा जगतपाल बलरामला (अमिताभ) शाळेत पाठवतो. त्याचा उद्देश असतो कि बलरामने पोलीस अधिकारी बनावे. राम (धर्मेंद्र) मोटर मेकॅनिक बनतो. जगतपालचे या दोघांवर नियंत्रण असते. राम जेव्हा मोठा होतो व कमवायला लागतो तेव्हा आपली सारी कमाई  चाचा जगतपालकडे देतो व खर्चासाठी थोडे पैसे ठेवायला जगतपाल रामला परवानगी देतो. 

            बलराम पोलीस अधिकारी बनून येतो तेव्हा जगतपाल त्याची योजना सांगतो. भारतातील सर्वात मोठया तस्करांना टार्गेट करण्यासाठी तो रामचा वापर करणार आहे. आता बलराम पोलीस अधिकारी असल्याने तो आपल्या भावाला अटक होण्यापासून वाचवेल. बलराम सुरक्षित आहे पण जगतपाल लहानपणी जशी मारायची तशी धमकी देतो. त्याच्या छडीच्या टोकाला सुई आहे आणि जेव्हा हि मुलं जगतपालला न आवडणारी एखादी गोष्ट करायची तेव्हा तो टोकदार आणि धोकादायक सुई त्या मुलांच्या गळ्यात घालायचा. 

            बलराम अजूनही जगतपालच्या योजनेवर नाराज आहे. म्हणून तो त्याच्या वरिष्ठांना सांगतो कि, त्याचा भाऊ तस्करांच्या अंडरवर्ल्डमध्ये घुसकोरी करण्याच्या प्रयत्नात आहे जेणेकरून बलराम त्यांना अटक करू शकेल. बलरामसाठी राम पोलिसांचा खबरी बनतो. 

          राम सर्वात मोठया तस्करांपैकी एक सुलेमानचा लेफ्टनंट बनतो आणि बलरामच्या अटकेचे प्रमाण त्याला दलातील सर्वात यशस्वी अधिकाऱ्यांपैकी एक बनवते. रामच्या बेकायदेशीर कमाईतून जगतपाल प्रचंड श्रीमंत होतो. कॉलेजच्या प्राध्यापिकेची मुलगी शोभा सोबत बलरामचे प्रेम जमते तर वडिलांच्या शोधात तिच्या आईसोबत आलेल्या मधुसोबत रामचे प्रेम जमते. रामला नकळत मुलगी तिचे वडील जगतपाल असल्याचे मानते व आपल्या आईसह जगतपालसाठी पैसे उकळण्याचा प्रयत्न करते पण जगतपाल वडील असल्याचे मानण्यास नकार देतो. माजी ग्राहकाला पैसे देताना आईला पकडल्यावर त्याच्या संशयाला पुष्टी मिळते. तो माणूस जगतपालच्या समोर येतो आणि मधू हि जगतपालची मुलगी नसल्याची कबुली देतो. 

            राम व बलरामच्या आईचा मृत्यू झालेला नसतो व ती परत येते तेव्हा जगतपालचा प्लॅन फसतो. जगतपालची सारी कृत्ये आई राम व बलरामला सांगते व दोघे मिळून त्याचा बदला घेतात.  

 

 

                                     'एक रास्ता दो राही' सुपरहिट गाणे

 

 

 

 

 

 

 









 

 

 

 

 

 

 

 

 










तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥

 तुकाराम महाराज गाथा - अभंग - आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥ आनंद अद्वय नित्य निरामय । जे कां निजध्येय योगियांचे ॥१॥ ...